मोबाईल व वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत चोरास अटक, समर्थ पोलिसांची कामगिरी

पुणे : मोबाईल व वाहनांची चोरी करणाऱ्या सराईत चोरास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन वाहनचोरी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.सुलतान रिझवान शेख (वय-१९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने हद्दीत प्रट्रोलींग करीत असतांना तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना खबर मिळाली की, नाना पेठ आझाद आळी मध्ये एक व्यक्ती मोबाईलची विक्री करणे करिता येणार आहे. त्यानूसार सापळा रचून सुलतानला ताब्यात घेण्यात आले. त्याचे जवळील मोबाईल बाबत चिवारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले. त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता, सदरचा मोबाईल त्याने नाना पेठ येथुन चोरल्याचे सांगितले.

सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळुन पाहिला असता समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने दीड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून हिरो होंडा पॅशन प्लस गाडी चोरल्याचे सांगितले. त्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. तसेच त्याने दोन दिवसांपूर्वी सासवडमधील बोत्रेआळी येथून होंडा डिओ गाडी चोरल्याचेही सांगितले. याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. इतकेच नाही तर आरोपीने दोन दिवसांपूर्वी नायडू हॉस्पिटलजवळ एक मोबाईलदेखील चोरला असल्याचे सांगितले. आरोपीकडे एकूण तीन मोबाईल सापडले असल्याने त्या मोबाईलच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत

 

ही कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मा. डॉ. संजय शिंदे, परिमंडळ -१ च्या पोलीस उप आयुक्त प्रियंका नारनवरे, फरासखाना विभागाचे सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनानुसार, सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सपोउपनिरी. सतीश भालेराव, पोलीस अंमलदार जितेंद्र पवार, धीरज शिंदे, सुमित खुट्टे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.