डबल मोक्कामध्ये फरार असलेला औंधचा भाऊ क्रुरकर्मा सावकार गायकवाड पितापुत्राला अटक, पुणे पोलिसाची मोठी कारवाई

पुणे  : पुणे आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच दोन्ही आयुक्तालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या औंधचा भाऊ’ क्रुरकर्मा सावकार गायकवाड पितापुत्राला पुणे शहर पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. त्यांना कर्नाटक येथून पकडण्यात आले आहे.

गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड आणि नानासाहेब शंकर गायकवाड  (दोघे रा. आय.टी.आय. रोड, औंध), नंदा नानासाहेब गायकवाड अशी अटक केलेल्यांची नाव आहे.

नानासाहेब गायकवाड हे मोठे उद्योजक आहेत तर गणेश गायकवाड हा एका पक्षाचा पदाधिकारी होता. त्याला राजकीय पक्षानं पक्षातून काढून टाकलं आहे.गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्याविरूध्द सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.स्वतःस व इतर साथीदारांस आर्थिक फायदा मिळविण्या साठी पिडीत व्यक्तिस अवैधरीत्या व्याजाने पैसे देवून ते वसूल करण्यासाठी रीव्हॉल्व्हरचा वापर करून , हवेत गोळीबार करून , जिवे मारण्याचा प्रयत्न करून , हिंसाचार करणेची धमकी देवून आणि धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने जमीनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज स्टॅम्प पेपर , लिहलेले व कोरे पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या पद्धतींची माहीती मिळाली आहे . त्यामध्ये व्याजाचे व्यवसायातुन लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहीती प्राप्त असुन अशा व्यवहारांतुन मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा तसेच इतर काही पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात देखील गायकवाड बाप-लेकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.प्रथम पिंपरी-चिचंवड पोलिसांनी याप्रकरणात गायकवाड यांच्यासह इतरांवर मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे. दरम्यान या तिघांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई व त्यांच्या पथकाला तो कर्नाटक येथे असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त देसाई, सहाय्यक निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक पंधरकर यांच्या पथकाने त्याला आज सायंकाळी कर्नाटक राज्यातून पकडले आहे. गायकवाड बाप-लेकास ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना कायदेशीरबाबी पुर्ण करून पुण्यात आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.