दरोडयाच्या गुन्हयात ७ वर्षापासून फरार असलेला आरोपीला अटक, पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

पुणे : दरोडयाच्या गुन्हयात ७ वर्षापासून फरार असलेला आरोपीला पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे.धनंजय काळे (वय २९ रा चंदनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी ६ आरोपींना अटक करण्यात आलेली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर २०१३ रोजी पहाटे ५ च्या सुमारास पुणे-नगर रोड, एल अँड टी फाटा, सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे येथे फिर्यादी संदीप तातडे हे त्यांचे ताब्यातील लोखंडी सळईने भरलेला ट्रक घेवून जात असताना त्यांना स्विप्ट कारमध्ये आलेल्या ७ अज्ञात आरोपींनी आडवून हाताने मारहाण करून जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाइल, रोख रक्कम ९ हजार रुपये हिसकावून घेवून लोखंडी सळईने भरलेला ट्रक चोरून पळवून नेला व ट्रकमधील ८,९६० किलो लोखंडी सळया असा एकूण ३ लाख ८६ हजार ५१३ रुपये किमतीचा माल चोरून रिकामा ट्रक न्हावरा ता.शिरुर येथे सोडुन दिला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी ६ आरोपींना अटक करण्यात आलेली होती. परंतु आरोपी नामे धनंजय काळे  हा तेव्हापासून फरारी होता.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवित असताना,   दरोड्याचे गुन्हयातील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी धनंजय  काळे  हा पुणे-नगर रोड, कोरेगाव भिमा ता.शिरूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या पोलीसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. आरोपीस पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोसई रामेश्वर धोंडगे, स.फौ. शब्बीर पठाण, पोहवा. सचिन घाडगे, पोहवा. दत्ता तांबे, पोहवा. प्रमोद नवले यांनी केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.