पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने लोखंडी कोयत्याने वार करून केला खून

पिंपरी चिंचवड : चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी कोयत्याने वारnकरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील विजयनगर माळवाडी, पुनावळेत मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

गौरी राहुल प्रतापे (वय 21, रा. विजयनगर माळवाडी, पुनावळे) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. राहुल गोकुळ प्रतापे (वय
30 रा. विजयनगर माळवाडी, पुनावळे मूळ रा.घारगाव,
ता. परांडा, जि. उस्मानाबाद) असे आरोपी पतीचे नाव आहे
याप्रकरणी नवनाथ रामदास बोरगे (वय 32, रा. विजयनगर, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो पत्नी गौरी हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून तिच्या सोबत भांडण करत होता. मंगळवारी याच कारणावरून त्याने गौरी हिच्याशी भांडण केले. तसेच चिडून तिच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यामध्ये
गौरीचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीसnठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी राहुल याला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.