पुण्यात खळबळ ! पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर तरुणाने स्वतःला पेटवून घेतले

पुणे : पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ३४) असे या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने स्वतःला पेटवून का घेतले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सुरेश पिंगळे हा तरूण काही कामासाठी आला होता. दरम्यान, त्याने अचानक अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेत आतमध्ये प्रवेश केला. रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हा प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्या लक्षात येताच, लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

तर, घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर जखमी अवस्थेत सुरेश पिंगळे यास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हा तरुण गंभीररित्या भाजला असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी बंडगार्डन पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.