वाढदिवसाच्या दिवशी मित्राला यमसदनी धाडणार्या नराधमास 24 तासात अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेची कामगिरी

पुणे : मित्राला वाढदिवसाच्या दिवशी यमसदनी धाडणार्या नराधमास स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेच्या पोलिसांनी 24 तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून अटक केली आहे.

दादाभाऊ मारुती वाघ (वय-26 ,राहणार-निमगाव दुडे,तालुका-शिरूर,जिल्हा-पुणे.हल्ली राहणार-हरुण पठाण यांच्या खोलीत ढोकसांगवी तालुका-शिरूर,जिल्हा- पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कानिफनाथ उर्फ रमेश सावता पांढरकर (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अंजली कानिफनाथ पांढरकर (वय 35 राहणार खंडाळे तालुका शिरूर जिल्हा पुणे) यानी फिर्याद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंजली यांचे पती कानिफना उर्फ रमेश पांढरकर हे 15ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता च्या सुमारास फिर्यादीस शेतात सोडून त्यांच्याकडील मोटारसायकल घेऊन त्यांचा वाढदिवस असल्याने तेथून निघून गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार त्यांच्याशी संपर्क केला परंतु फोन बंद लागला. त्यानंतर दिनांक 16 ऑगस्ट रोजी खंडाळे गावचे पोलीस पाटील यांच्याकडून माहिती मिळाली की फिर्यादीचे  पती कानिफनाथ उर्फ रमेश हे न्हावरा – तळेगाव रोडलगत घाटाजवळ जखमी अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता फिर्यादीचे पती यांना कोणीतरी जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घालून त्यांना जीवे ठार मारून त्यांचे डोक्यावर व चेहर्‍यावर दगड मारून चेहरा विद्रूप करून त्यांची ओळख पटू नये. याकरता पुरावा नष्ट केला वगैरे मजकूर ची फिर्याद शिरूर पोस्टे येथे दिली आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डाॅ. श्री.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे उद्देशाने सुचना करून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सपोनि. सचिन काळे, सहा. फौजदार तुषार पंदारे, पोहवा. जनार्दन शेळके, पो.हवा. राजु मोमीण, पो.हवा. अजित भुजबळ, पो.ना. मंगेश थिगळे, चा.पो.हवा. मुकेश कदम यांचे तपास पथक नेमले होते. सदर पथकाने कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्यावरून सदरचा गुन्हा हा आरोपी दादाभाऊ वाघ याने व त्याच्या नात्यातील एका विधीसंघर्षित बालकाचे मदतीने केला असल्याची माहिती त्यांना मिळाली व सदर आरोपी हा ढोक सांगवी येथे एका बिल्डिंगमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि येळे, पोसई मुंडे व स्टाफ चे मदतीने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे आरोपीने कबूल केले आहे.

सदर आरोपीवर यापूर्वी लोणीकंद पोलिस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि सचिन काळे, सहा.फौज. तुषार पंधारे,  पोहवा जनार्दन शेळके, पोहवा राजू मोमीन, पोहवा अजित भुजबळ,
पोना मंगेश थिगळे, चापोहवा मुकेश कदम व रांजणगाव पो.स्टे चे सपोनि येळे ,पोसई मुंढे यांनी केली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.