अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; दीड लाखाची दारू जप्त

पिंपरी चिंचवड :  अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत चार कार आणि एक लाख 59 हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18) सकाळी संतनगर, मोशी येथे करण्यात आली.

सोमनाथ किसनराव रासकर (वय 38, भोसरी), दिगंबर मारुती गायकवाड (वय 39, रा. चिंबळी, ता. खेड), मंगेश बाळासाहेब शिवले (वय 31, रा. डुडुळगाव, ता. हवेली), सुनील बाळू देडे (वय 27, रा. भाटनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींसह रितिक वाईन्सचे मालक, तुळजाई हॉटेलचे मालक सचिन सस्ते यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी दारू विक्री बंद असताना देखील स्पाईन सिटी चौक, मोशी येथील रितिका वाईन्स मधून अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संत नगर मोशी येथे आरटीओ रोड चौकात सापळा लावून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी एक लाख 59 हजार रुपये किमतीची देशी, विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच 10 लाख 30 हजार रुपये किमतीच्या चार कार जप्त केल्या.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, (मुख्यालय)  सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सपोनि डॉ.
अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि धैर्यशिल
सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, अनिल महाजन, जालिंदर गारे, मारुती करचुंडे,
गणेश कारोटे, संगिता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.