खंडणी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार करुन सोन्याचे दागिने लुटले ; ६ खंडणी बहाद्दर दरोडेखोरांना अटक
पिंपरी चिंचवड : खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिल्याने एकावर धारदार कोयत्याने वार करुन सोन्याचे दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी सहा खंडणी बहाद्दर दरोडेखोरांना बुधवारी ( दि. १८ ऑगस्ट ) अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन लोखंडी कोयते, चार लाकडी दांडकी व तीन मोटार सायकली जप्त केल्या आहेत. हा प्रकार चाकण औद्योगिक क्षेत्रातील भांबोली गावच्या हद्दीत घडला.
अक्षय किसन कोळेकर ( वय २४, रा. भांबोली, ता. खेड ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. कोळेकर यांच्या फिर्यादी वरून आकाश बाळासाहेब शेळके ( वय २५, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड ), गणेश बबन डांगले ( वय २०, रा. गवारवाडी, पाईट, ता. खेड,), नारायण सुनील घावटे ( वय २१, रा. शेलू, ता. खेड ), गणेश हिरामन लिंभोरे ( वय २०, रा. शेलू, ता. खेड,), विठ्ठल नवनाथ पिकळे ( वय २१, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड ) व साईनाथ रामनाथ राऊत ( वय ३०, रा. भांबोली, ता. खेड ) यांना अटक करण्यात आली असून संतोष मधुकर मांजरे ( रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड ), प्रदीप अरुण पडवळ ( रा. बोरदरा, आंबेठाण, ता. खेड,) सुमित भोकसे ( रा. कुरकुंडी, ता. खेड,) व अन्य एकजण हे फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोली येथे रविवारी ( दि. ८ ) रात्रीं आठ वाजण्याच्या फिर्यादी अक्षय किसन कोळेकर यांच्या पानटपरीवर येऊन सदर पानटपरी चालू ठेवायची असेल तर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हप्ता दे, अशा खंडणीची मागणी फिर्यादी कोळेकर यांच्याकडे सराईत गुन्हेगार संतोष मधुकर मांजरे याने केली.परंतु अक्षय कोळेकर याने संतोष मांजरे यास हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून सराईत गुन्हेगार संतोष मांजरे याने त्याचे इतर नऊ ते दहा साथीदारांसह येवून फिर्यादी अक्षय कोळेकर व त्याचे मित्र जीवन मधुकर पवार, सचिन ज्ञानदेव बोत्रे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लोखंडी कोयेते, लाकडी दांडक्याने डोक्यात, हातापायावर जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
तसेच जीवन मधुकर पवार यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, सचिन ज्ञानदेव बोत्रे याच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन असा साठ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने दरोडा घालून लुटला.
सदर घटनेबाबत चाकण पोलिस ठाण्यात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन ०६ आरोपींना जेरबंद केले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडळचे मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार,पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु जाधव, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, श्रीधन इचके, हिरामन सांगडे, शरद खैरे, यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सचिन सुर्यवंशी हे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!