पाणी अंगावर उडाल्याच्या रागातून हातात कोयते घेऊन सय्यदनगर मध्ये दहशत माजवत एकावर हत्याराने वार ; चौघांना अटक

पुणे : पाणी अंगावर उडाल्याच्या रागातून पालघन, कोयते हातात घेऊन सय्यदनगर मध्ये दहशत माजवत एकावर हत्याराने वार करून 27 हजार 500 रूपये जबरी चोरी करणार्‍या टोळक्यावर वानवडी पोलिस ठाण्यात दरोडा, हत्यार बाळगणे व धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

शादाब मेहबुब सय्यद (वय 18), बरकत अली अस्लम शेख (वय 19), जुबेर माबुत खान (वय 19) आणि नासीर रसुल शेख (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून गुप्या, अफताब, मुजमील व त्याच्या तीन साथीदारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुजीब गालिब तांबोळी (वय 25, रा. मंगळवारपेठ, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुजीब तांबोळी हे मंगळवार पेठेत राहण्यास आहेत. ते त्यांचा कामगार अफशान याला कामाचे पैसे देण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता गेले होते. आरोपी आणि एका व्यक्तीमध्ये पाणी उडाल्यावररून सय्यदनगर गल्लीनंबर 11 मध्ये वाद झाले होते. याच वादाच्या कारणावरून फिर्यादी मुजीब हे त्यांचा कामगार अफशान शेख याच्याकडे गेल्यानंतर गल्लीत उभे असताना आरोपींनी हातात कोयता, पालघन सारखी हत्यारे घेऊन येत जोरजोरात आरडा ओरडा करून दहशत पसरवली.

हम यहा के भाई है, सबको देख लेंगे म्हणून शिवीगाळ सुरू केली. परंतु, मुजीब तांबोळी यांचा भांडणाशी काही संबंध नसताना गुप्या नावाच्या आरोपीने पालघनने मुजीब तांबोळीवर वार केले. इतर आरेापींनी त्यांना मारहाण करून त्यांना दुखापत केली. दरम्यान, फिर्यादी यांनी त्याच्या कामगाराला देण्यासाठी आणलेले 27 हजार 500 रूपये खिशातून काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.