फसवणूक करुन चारचाकी वाहने परराज्यात विक्री करणा-या सराईत टोळी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पुणे : फसवणूक करुन चारचाकी वाहने परराज्यात विक्री करणा-या सराईत टोळीस गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १३ वाहने जप्त करण्यात आले आहे.

मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय ३८ वर्षे, रा. फ्लॅट नं ४०५, युनिटी टॉवर, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे ४८,) ओंकार ज्ञानदेव वाटाणे (वय २८ वर्षे, व्यवसाय नाही, रा. मु. पो. हिंगणी बेर्डी, ता. दौंड, जि. पुणे), मोहमद मुजीब मोहमद बसीर उद्दीन, (वय ४८ वर्षे, व्यवसाय चालक, रा. १५-१७३/ १३१/ए, संतोषनगर, पाणी टाकी जवळ, संतोषनगर, हैद्राबाद, राज्य तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ओला कंपनीमध्ये स्वताची स्विफ्ट डिझायर कार चालवितात. ओला कंपनीमध्ये कार चालवित असताना त्यांची ओळख मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद सय्यद गिलानी याच्याशी झाली. त्याने तो नोएडा, उत्तर प्रदेश येथील युनायटेड एस एफ सी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरची कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे सांगून त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे सांगून फिर्यादीस अमिष दाखवून १५ मार्च ते २७ जुलै या साडे चार महिन्याच्या कालावधीमध्ये फिर्यादीकडून त्याची व इतरांची अशी एकूण २८ चारचाकी वाहने ताब्यात घेतली.

आरोपींनी वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली व वाहने घेवून फिर्यादीची फसवणूक करून तो फरार झाला होता. फिर्यादीने सदरच्या कंपनीबाब तनोएडा, उत्तर प्रदेश येथे जावून माहिती काढली असता त्यास अशी कोणतीही कंपनी मिळून आली नसल्याने त्याची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्याने वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. नमूद गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट ६ करित होते.

या गुन्ह्याचा तपास करत असताना युनिट ६ च्या पोलिसांना माहिती  मिळाली की, नमूद गुन्हयातील इनोव्हा कार क्रं एम एच १४ एफ सी ०३७१ ही दौंड, पुणे येथे बस स्टैंड परिसरामध्ये विक्रीकरिता येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २० ऑगस्ट रोजी पोलीस कस्टडी देण्यात आली. आरोपींकडून पोलीस कस्टडीदरम्यान महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील विजयनगर, ता. बिलोली, जि. नांदेड व बालकोंडा, जि. निजामाबाद, तेलंगणा येथून एकूण १ कोटी २२ लाख रुपये किंमतीच्या ०४ इनोव्हा क्रिस्टा, ०१ मारुति सूझूकी इर्टिगा, ०२ स्विफ्ट डिझायर, ०४ आयशर, ०२ अशोक लेलंन्ड अशी एकूण १३ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. नमूद गुन्हयाचा तपास सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह-.आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, अशोक मोराळे, पोलीस उप.आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे,.सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.