खात्यात Zero Balance आहे, पैशाची गरज आहे? तर बॅंकेच्या ‘या’ सुविधेचा फायदा घ्या

मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींना खूप सामोरं जावं लागत आहे.  प्रत्येकाला पैशांची अचानक, कधीही गरज भासू शकते. पण अशावेळी बँक अकाऊंटमध्ये पैसेच नसतील, अकाऊंटमध्ये झिरो बॅलेन्स असेल तर? अशावेळी बँकेकडून ओव्हरड्राफ्ट ही सुविधा घेता येऊ शकते. अकाऊंटमध्ये पैसे नसल्यास, झिरो बॅलेन्स असला, तरीही बँकेतून या सुविधेद्वारे पैसे काढता येऊ शकतात.

जर तुम्ही सॅलरीड कर्मचारी आहात आणि तुमची सॅलरी दरमहिना बँक खात्यात क्रेडीट होत असेल तर तुम्ही सॅलरी ओव्हरड्राफ्टचा  फायदा घेऊ शकता. सॅलरी ओव्हरड्राफ्ट एकप्रकारचे रिव्हॉल्विंग क्रेडिट असते, जे सॅलरी अकाऊंटवर मिळते. जेव्हा तुम्हाला सॅलरीशिवाय जास्त पैशांची आश्यकता असते, तेव्हा तुम्ही या खात्यातून जादा रक्कम काढू शकता

कुणाला मिळतो ओव्हरड्राफ्ट

सर्व बँक ग्राहकांना ही सुविधा मिळत नाही. बँक आपल्या काही ग्राहकांना आणि त्यांच्या कंपनीचे क्रेडिट प्रोफाइल पाहिल्यानंतरच ओव्हरड्राफ्ट सुविधा देते. ICICI Bank, SBI सारख्या बँका ही सुविधा देतात. बँकेच्या कस्टमर केयरवर याबाबत माहिती घेऊ शकता. बँकेचे ओव्हरड्राफ्टचे लिमिट अगोदरच ठरलेले असते

सॅलरी ओव्हरड्राफ्टचे लिमिट
काही बँका मंथली सॅलरीच्या 2-3 पटपर्यंत ओव्हरड्रॉफ्टची सुविधा देतात. तर काही बँका मंथली सॅलरीच्या 80-90 टक्के पर्यंत ही सुविधा देतात. काही बँकांसाठी ओव्हरड्राफ्ट कॅपच्या नियमावर काम करतात. याचे कमाल लिमिट 4-5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. काही बँकांसाठी हे कॅप 1-1.5 लाख रुपयापर्यंत असते.

बँक ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या अटी

या सेवेच्या अटी आणि शर्थी थोड्या किचकट आहेत. सर्वप्रथम भारतातील केवळ निवडक बँका सध्या आपल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. दुसरे म्हणजे ही सेवा पगारदार व्यक्तींना दिली जाते, ज्यांचे बँकेत सॅलरी अकाऊंट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बँक खात्यांद्वारे अॅडव्हान्स पैसे देण्यापूर्वी बँक ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरवर एक नजर टाकते. जे ग्राहक बँकेच्या अटींची पूर्तता करतात, ते या बँक सुविधेचा वापर कोणत्याही आर्थिक अडचणीला सामोरे जाण्यासाठी करू शकतात.

ओव्हरड्राफ्ट खाते कसे कार्य करते?

तुमच्याकडे बँक ओव्हरड्राफ्ट खाते असल्यास, तुम्हाला कर्जाप्रमाणेच ओव्हरड्राफ्टची रक्कम दिली जाईल. जर तुम्हाला बँकेकडून ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळाली असेल, तर गरज पडल्यास तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता, जे ओव्हरड्राफ्टमध्ये जाईल. याचा फायदा घेऊन, तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढते आणि जेव्हा तुम्ही ओव्हरड्राफ्ट खात्यात पैसे जमा करता, तेव्हा ही शिल्लक कमी होते. पूर्ण रक्कम परत होईपर्यंत बँक तुमच्याकडून व्याज आकारेल.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.