गांजा आणि गावठी हातभट्टी विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई, एकाला अटक
पिंपरी चिंचवड : गांजा आणि गावठी हातभट्टी विक्री केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 19) पुनावळे येथे करण्यात आली.
समीर गजानन गोरगले (वय 28, रा. महापालिका दवाखान्याच्या मागे, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील महापालिकेच्या दवाखान्याच्या मागे एक तरुण गांजा आणि गावठी हातभट्टी विकत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी आरोपी समीर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 12 हजार 700 रुपये किमतीचा 508 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. तसेच पाच हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. पोलिसांनी कारवाईमध्ये एकूण 53 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!