समृद्धी महामार्गावर ट्रक उलटून भीषण अपघात; 13 मजूरांचा जागीच मृत्यू

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील   तढेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामावरील डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 मजूरांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, तर 7 मजूर जखमी आहेत.  लोखंडी राॅडने भरलेल्या डंपरमधून 16 मजूर प्रवास करत होते. दुर्घटनेत मृत्यू पावलेले व्यक्ती समृद्धी महामार्गचे काम करणारे मजूर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर समृद्धी महामार्गाच्या कामावर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला. अपघातात मृत्यू पावलेले मजूर समृद्धी महामार्गावर काम करणारे असून ते परप्रांतीय असल्याची माहिती आहे. अपघातात 13 मजूरांचा मृत्यू झाला तर 12 मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या कामावरील हे डंपर लोखंडी रॉड घेऊन समृध्दी महामार्गाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की डंपर पलटी झाल्यावर लोखंडी रॉड खाली 16 मजूर दबले गेले आहेत. तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केल्याने जखमींना बाहेर काढण्यात आलं. अजूनही मृतांचा आकडा वाढू शकतो

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे त्याच दरम्यान तळेगाव येथे भीषण अपघात झाला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.