सावधान! डी – मार्टच्या फेक लिंकवर क्लिक कराल तर होऊ शकतं नुकसान

मुंबई : सध्या सोशल मिडीयावर डी मार्ट च्या 20 व्या ॲनिवर्सरी बद्दल फ्री गिफ्ट चे आमिष दाखविणारा एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेज मध्ये एक लिंक देण्यात आली असून या लिंकवर क्लिक केल्यास चार प्रश्न विचारले जातात. पण, हा मेसेज फसवा असून तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाने याबाबत माहिती देणारं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर डी मार्टचा लोगो ओपन होतो, त्यामुळे ग्राहकांचाही विश्‍वास बसतो, भामट्यांनी त्यामुळे हा फंडा निवडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

सध्या व्हॉट्सअॅपवर वर एक लिंक फिरत आहे सदर लिंक हि नामांकित सुपरमार्केट DMart यांची असल्याचे भासवून त्यांच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त, ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करणारी बनावट लिंक. संदेश व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले जात आहेत.

सदर बनावट लिंकवर क्लिक केल्यास, एक वेबपेज उघडते ४ प्रश्न विचारले जातात जसे कि तुम्ही DMart ला ओळखता का? तुम्ही कोणत्या वयोगटात बसता? तुम्हाला Dmart कसे वाटते ? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किंवा एक ‘स्पिन व्हील’ दिले जाते ते फिरवल्यास एक पॉपअप येतो त्यात तुम्ही ५०००/-रुपयांपर्यंतचे गिफ्ट कार्ड तसेच काही वस्तू जिंकला आहात असे भासवून सदर स्पर्धा इतर मित्रांसह व्हॉट्सअॅपवर ५ गुप/२० मित्रांसोबत शेअर करा असे सांगितले जाते. स्क्रीनवरील ब्लू बार पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्याने शेअर करत राहणे आवश्यक आहे असे सांगून आपणाकडून आपल्या बँक विषयी गोपनीय माहिती विचारू शकतात ज्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते असे सायबर विभागाने म्हटले आहे.

यासारख्या फसव्या लिंक ओपन करु नये, आपला ओटीपी शेअर करु नये, अनोळखी अँप डाऊनलोड करु नये, अनोळखी फोनकॉलवर स्वत:ची कोणतीही माहिती देवू नये. तसेच कोणतीही बँक खात्याशी संबंधीत माहिती जसे की, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ. माहिती मागत असल्यास सदरची गोपनीय माहिती कोणासही देऊ नये. तसेच समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणतेही अँप्लीकेशन डाऊनलोड करु नये. तसेच स्वत:च्या फेसबुक, इंस्टाग्राम, टिटर इ. च्या खात्याचा पासवर्ड स्वतःचा मोबाईल क्रमांक न ठेवता तो अंक/अक्षरे/चिन्ह असलेल्या स्वरुपात ठेवावा असं आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.