मोशीत प्लॅस्टिकच्या पिशवीत गांजा घेऊन थांबलेल्या आरोपीला अटक, 21 किलो गांजा जप्त

पिंपरी चिंचवड : प्लॅस्टिकच्या पिशवीत गांजा घेऊन थांबलेल्या एकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 90 फुटी रोड, मोशी याठिकाणी करण्यात आली.

संजय सदाशिव मोहीते (वय 40, रा. एकता कॉलनी, शास्त्री चौक, भोसरी) असं अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई नितिन खेसे यानी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहीते हा 90 फुटी रोड, मोशी याठिकाणी दुचाकीवर प्लॅस्टिकच्या पिशवीत गांजा घेऊन थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर परि-०1, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, MIDC भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप पाटील, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस हवालदार शरद गांधिले, पोलीस अंमलदार अनिल जोशी, करन विश्वासे, रहीम शेख, नितिन खेसे, विशाल काळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.