रशियाच्या दोन महिलांचा गोव्यात मृत्यू
पणजी : गोव्यातील सिओलिम गावात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन रशियन महिलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये महिला ज्या भाड्याच्या घरांमध्ये राहत होत्या तिथं मृतावस्थेत आढळल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 24 वर्षीय अॅलेक्झांड्रा जावी गुरुवारी त्यांच्या घरी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्या. तर तिची 34 वर्षीय मैत्रिण शुक्रवारी तिच्या अपार्टमेंट मध्ये मृतावस्थेत आढळली आहे.सिओलिम गावात त्या दोघीही वेगवेगळ्या घरात रहात होत्या. त्यांच्या अंगावर अन्य कोणत्याही जखमा नाहीत. तथापि आम्ही सर्व बाजु लक्षात घेऊन तपास करीत आहोत असे पोलिसांनी सांगितले. या दोघी एकमेकांच्या मैत्रिणी असल्याचे सांगितले गेले असले तरी पोलिस तपासात मात्र तसे काही आढळून आलेले नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघींच्या मृत्यू विषयी प्राथमिक तपासात तरी पोलिसांना कोणतेही धागेदारे मिळून आलेले नाहीत.
In two separate incidents, two Russian nationals, both women, were found dead in their respective rented homes in Siolim, a village in North Goa during on Friday: Goa Police
— ANI (@ANI) August 21, 2021
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!