गोडाऊनमधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या चोरट्यास अटक, गुन्हे शाखेच्या युनीट चारची कामगिरी

पुणे – कोंढवा परिसरातील पत्रा, वायर, तेलाच्यान गोडाऊनमधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध आठ गुन्हे दाखल असून मागील आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दयानंद झा (वय 42, रा. चिखली, मुळ रा. बिहार)असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध वस्तु खरेदी-विक्रीचे गोडाऊन आहेत. आरोपी झा हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने या परिसरातील गोडाऊनमध्ये चोरी करून त्यातील पत्रा, वायर, तेलाचे डबे यांसारख्या वस्तु चिखली येथील स्क्रॅपच्या व्यावसायिकांना विक्री करीत होता. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गोडाऊन फोडीचे आठ गुन्हे दाखल होते. तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता

गोदामात चोरी केल्यानंतर सराईत दयानंद झा मूळगांवी बिहार येथे पळून गेला होता. दरम्यान, आठ वर्षांपुर्वी गोदामात चोरी करणारा पिंपरीतील चिखली परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाली.त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या.मार्गदर्शनाखाली पथकाने चिखली परिसरात आरोपीचा शोध घेतला.

त्यानुसार पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चिखली परिसरात आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी तो पिंपळे सौदागर मधील कृष्णा चौकात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून दयानंद झा याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारसह गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर
यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शोभा क्षिरसागर, पोलीस उप
निरीक्षक जयदिप पाटील, राजस शेख, दिपक भुजबळ, प्रविण
भालचिम, प्रविण कराळे, शितल शिंदे, महेंद्र पवार, स्वप्निल कांबळे
यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.