पिंपरी-चिंचवड महापालिका लाच प्रकरण ; स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना तात्पुरता जामीन, चौघांना न्यायालयीन कोठडी

पिंपरी चिंचवड : लाच प्रकरणात अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना आज (सोमवारी) न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केले. तर, इतर चार कर्मचा-यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे, संगणक चालक राजेंद्र शिंदे, लिपीक विजय चावरिया व शिपाई अरविंद कांबळे या पाच जणांना  पोलिसांनी गुरुवारी (दि.19) पहाटे अटक केली. त्यांना दोनवेळा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

सुरुवातील गुरुवारी (दि. 19) दोन दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा शनिवारी या पाच जणांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत (दि. 23) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज या पाचही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते

न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र ऍड. नितीन लांडगे यांच्यामार्फत घरामध्ये कार्य असून त्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागण्यात आली. यावर न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत लांडगे यांना अंतरिम जामीन दिला आहे. उर्वरित चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.