बनावट आधार कार्ड बनविणारा गुन्हेगार व मोबाईल चोर जेरबंद ; समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची दुहेरी कामगिरी

पुणे : बनावट आधार कार्ड बनविणारा सराईत गुन्हेगारास समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. तसेच गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी करणा-या चोरालाही अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि. 20 ऑगस्ट रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखल गुन्हयातील आरोपीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व पांढऱ्या रंगाची ऍक्‍टीवा गाडीच्या आरटीओ नंबरच्या आधारे त्याचे रहाते घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चोकशी केली असता त्याने त्याचे नाव विनायक राजू पूजारी (वय २७ वर्षे, रा. स.नं. ६६, डोबरवाडी, घोरपडीगांव, पुणे) असे सागितले.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने १९ ऑगस्ट रोजी दारुवाला पुल चौक येथे सकाळी १० वाजता नायडु स्टोअर्स जवळ असलेल्या इडली वडा सेंटर येथे फिर्यादी नाष्टा करीत असताना गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे शर्टचे खिशातील मोबाईल फोन चोरी केल्याबद्दल  सांगीतले. पोलिसांनी त्याच्याकडून सदरचा मोबाईल व ऍक्‍टीवा गाडी गुन्हयाचे पुरावे कामी जप्त केली आहे.

तर दुसऱ्या एका प्रकरणात समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयात एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी रणजित बबन खेडेकर (35, रा. खेडेकर मळा, ऊरुळी कांचन पुणे) यास अटक केली आहे.

तो बनावट आधार कार्ड अगदी सहजरीत्या बनवून देतो व सदरच्या गुन्हयामध्ये बनावट आधार कार्डचा वापर झालेला असून ते बनावट आधार कार्ड रणजित खेडेकर यानेच बनवून दिले आहे. सदरचा  आरोपी हा मागील एक वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता व पत्ता बदली करून रहात असलेने मिळून येत नव्हता.

सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त श्रीमती प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक, संदीप जोरे, सहायक उपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुमित खुट्टे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, रिकी भिसे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.