बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणार्‍याला अटक, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 ची कामगिरी

पुणे  : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 ने अटक केली आहे. त्याच्याकडून 1 पिस्तुल आणि 1 काडतुस असा एकुण 40 हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. वानवडी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात  आले आहे.मलेश सारंग वेलायधन (25, रा. घोरपडी वस्ती, श्रीवस्तीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक – 2 मधील पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी मलेश हा वानवडी रोडवरील एका अमृततुल्य चहा सेंटरच्या समोर फिरत असून त्याच्या कमरेला पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीसांनी आरोपीला  ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 पिस्तुल आणि काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याच्याविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.