वजन कमी करण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

नवी दिल्ली : वजन कमी करण्याचे आमिष दाखवून एका जिम ट्रेनरने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये समोर आली आहे. इतकेच नाही तर तिचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

धर्मेंद्र जोशीला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना शहरात एका जिममध्ये आरोपी धर्मेंद्र हा व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. एका 40 वर्षीय महिलेला वजन कमी करण्याचे त्याने आमिष दाखवले. नंतर सडपातळ होण्यासाठी आरोपी धर्मेंद्रने महिलेला इंजेक्शन्स दिले. पण त्यात धर्मेंद्रने बेशुद्धीचे औषध मिसळले होते. महिला बेशुद्ध झाल्यानंतर धर्मेंद्रने तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर तिचे अश्लील फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मेंद्रने महिलेकडे 5 लाख रुपये मागितले होते. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.