सोशल मिडियावरुन झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे :  सोशल मिडियावरुन झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल 2020 ते जुलै 2021 पर्यंत घडला आहे

अरुण सोमनाथ शिंदे (वय 21, रा. पिंपरी, नातेपुते, सोलापूर) याला अटक केली आहे.याप्रकरणी एका 17 वर्षाच्या मुलीने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची उत्तर प्रदेशातील राहणारी आहे. तिचे इंस्टाग्राम वरुन आरोपी अरुण शिंदे याच्याबरोबर ओळख झाली होती. अरुण शिंदे याने या मुलीला ते लग्न करणार असल्याचे सांगून गेल्या 6 महिन्यांपासून वेगवेगळ्या लॉजवर तसेच भाड्याच्या खोलीत घेऊन जाऊन तिच्याशी शारिरीक संबंध केले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण शिंदे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.