महत्त्वाची बातमी! WhatsApp वर बुक करता येणार Corona Vaccination Appointment ; जाणून घ्या प्रक्रिया

 

वी दिल्ली  : देशात कोरोना व्हायरसविरोधात लसीकरण मोहिम सुरू आहे. आता लसीकरणासाठी स्लॉट बुक करणं आणखी सोपं होणार आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारनं लसीकरण मोहीम वेगानं वाढवली आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित केलं जात आहे.

Whatsapp वर लस घेतल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट मिळत होतं. मात्र आता तुम्हाला घरबसल्या लसीची अपॉइंटमेंटही बुक करता येणार आहे. खरंच यासंदर्भात मायगोव इंडिया या ट्वीटर अकाऊंटवरून व्हिडीओद्वारे माहिती देण्यात आली आहे.

माइगोव कोरोना हेल्पडेस्क तुम्हाला आता Whatsapp वरून लसीची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे MyGovIndia Corona Helpdesk ला बुक स्लॉट लिहून पाठवल्यास वॅक्सिनेशन स्लॉट बुक होईल. त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 9013151515 वर व्हॉट्सअ‍ॅप करावं लागेल. त्यानंतर ओटीपी टाकून आपला स्लॉट बुक करावं लागेल.

वॅक्सिनेशन स्लॉट बुक करण्यासाठी बुक स्लॉट लिहून पाठवावं लागेल, अशी माहिती WhatsApp कडून देण्यात आली. MyGovIndia Corona Helpdesk आता आपल्या प्लॅटफॉर्मवर मेसेजिंग अ‍ॅपच्या युजर्सला जवळच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळवून देण्यासाठी आणि अपॉईंटमेंट बुक करण्याची सुविधा देईल.

 

5 ऑगस्टपासून मायगोव्ह आणि व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी चॅटबॉटमधून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत, देशभरातील 32 लाखांहून अधिक नागरिकांनी प्रमाणपत्रे डाउनलोड केली आहेत. त्यामुळे आता बुकिंग अपॉइंटमेंटचा फायदाही देशातील अनेक नागरिकांना होणार आहे

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.