महिलेचा घरापर्यंत पाठलाग करत केली शरीर सुखाची मागणी; पिंपरीतील तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : महिलेचा वारंवार घरापर्यंत पाठलाग करून शरीर सुखाची मागणी  करत महिलेचा विनयभंग केला.  याप्रकरणी पिंपरी येथील एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (22 ऑगस्ट) रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

राहुल प्रकाश गायकवाड (वय, 27, रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) असं त्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी,  आरोपी राहुल गायकवाड याने महिलेचा वारंवार पाठलाग केला, तसेच रविवारी फिर्यादी महिलेचा घराचा दरवाजा देखील ठोठावला. त्या घराबाहेर आल्या असता आरोपी तरुणाने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच शरीर सुखाची मागणी करून लांच्छन कृत्य केले आहे. याप्रकरणी तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पालांडे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.