अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला फेकले ओढ्यात, मात्र बाळ ‘सुखरुप’
पुणे : पुण्याच्या सहकारनगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक दिवसाचा बाळाला निर्दयी मातेने ओढ्यात फेकून दिले होते. परंतु स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेने या बाळाचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी 40 वर्षीय निर्दयी मातेवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आंबील ओढा परिसरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री लहान बाळाच्या रडण्याच्या आवाजाने स्थानिक नागरिक जागे झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दत्तवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बाळाला चिखलातून बाहेर काढले. महिला पोलिसांनी त्याला मायेची ऊब दिली आणि तातडीने उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
या घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसर पिंजुन काढला होता. तपासादरम्यान नागरिकांकडून माहिती मिळाली की अनैतिक संबंधातून एका महिलेने सदर बालकाला बदनामी टाळण्याकरीता जन्म देताच ओढ्याच्या कडेला सोडून दिल्याचे पोलिसांना समजले. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये महिलेवर गुन्हा दाखल केला असुन पुढील कारवाई पोलीस उप – निरीक्षक रवींद्र कस्पटे हे करत असून बाळ सध्या ससून रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!