दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक ; गुन्हे शाखा युनिट 4 ची कामगिरी

पुणे : दरोडा टाकून लुटमार करण्याच्या तयारी असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील 4 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली असून एकजण फरार झाला आहे.ही कारवाई सेनापती बापट रोडवरील समर्थ रिक्षा स्टँड जवळ मंगळवारी (दि.24) रात्री पावणे दहाच्या सुमारास केली.

साकिब अन्सारी (वय-23), दानिश शेख (वय-22), सलमान अलवी (वय-26), वसिम अन्सारी (वय-24 रा. नागपुर चाळ, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद अन्सार हा फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक विशाल कुमार शिर्के यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील शैलेंद्र सोसायटी जवळ असलेल्या समर्थ रिक्षा स्टँडजवळ पाच जण दरोडा टाकून लटुमार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथिदार पळून गेला. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे लोखंडी सुरे, तलवार, कटावनी, मोबाईल, रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.