‘देवमाणूस’मधील रेश्मा झळकणार अंधश्रद्धेवर आधारित सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज मध्ये

‘देवमाणूस’ या मालिकेतून रेश्माच्या भूमिकेत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गायत्री बनसोडे आता वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.अंधश्रद्धेवर आधारित सस्पेन्स थ्रिलर ‘परीस’ या वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

भारतातील बराचसा प्रदेश ग्रामीण असून या भागात आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा या सामाजिक, ज्वलंत आणि महत्वाच्या विषयावर सिरीज आधारित आहे. या वेबसीरिजचे संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘वन कॅम प्रॅाडक्शन’ प्रस्तुत ‘परीस’ या वेबसीरिजची कथा मयूर करंबळकर यांची आहे.

सोन्याच्या लोभापोटी गावातील काही लोक परीसाच्या शोधात निघतात. त्यांचा हा शोध त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो, त्यांना परीस मिळवण्यात यश येतं का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना यात मिळणार आहेत. ही वेब सीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.