वैद्यकीय सुट्टीवर असताना पुण्यातील हॉटेल मालक आणि मॅनेजर सोबत हुज्जत घालून पैसे मागितल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक निलंबित
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वैद्यकीय रजेवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल मालक आणि मॅनेजरशी हुज्जत घालत पैशांची मागणी केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. गंभीर बाब म्हणजे रुग्णनिवेदन रजेवर असताना शासकीय गणवेश घालून उपनिरीक्षकाने हा प्रकार केला असल्याने त्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. मिलन कुरकुटे असे निलंबित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक मिलन कुरकुटे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहेत. 21 ऑगस्ट 2021 पासून ते रुग्णनिवेदन रजेवर होते. दरम्यान 24 ऑगस्ट रोजी रजेवर असताना कुरकुटे शासकीय गणवेश घालून पुणे शहरातील मुंढवा येथील हॉटेल कार्निव्हल येथे गेले.
त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालक आणि मॅनेजर सोबत हुज्जत घालून पैशांची मागणी केली. याबाबत हॉटेल मालकाने मुंढवा पोलिसांना माहिती दिली. मुंढवा पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयास या घटनेची माहिती दिली.पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणा-या अशोभनीय कृत्याबद्दल त्यांचे त्वरित प्रभावाने निलंबन करण्यात आले आहे.
संबंधित पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे हे या अगोदर एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. त्यामुळं त्यांची प्रतिमा ही लाचखोर पोलीस अधिकारी अशीच आहे…
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!