‘मला त्रास देणाऱ्यांचा बदला घ्या’ अशी सुसाईट नोट लिहून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  दरम्यान, या मुलीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवलेली असून त्यामध्ये, ‘माझ्या मृत्यूला रुस्तम जबाबदार आहे. त्याने माझ्याशी दुष्कर्म केले आहे. बाबा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला घ्या’, असं म्हटलं आहे. या सुसाईट नोटमुळे खळबळ उडाली आहे.

रुस्तम असे मुख्य आरोपीचे नाव असून तो पसार झाला आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली असून सुरेरी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. . त्याला पकडण्यासाठी पोलीस जोरदार शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे.

जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला काही तरुण त्रास देत होते. त्यामुळे ही मुलगी खूप त्रस्त होती. मंगळवारी, ही मुलगी रात्री झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली. मात्र सकाळी खूप उशिरापर्यंत खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा आईने खोलीचा दरवाजा उघडला असता तिला धक्काच बसला. मुलीने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. हे सर्व पाहून मयत मुलीच्या आईने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. तो ऐकून लोक जमा झाले. यावेळी कुटुंबीयांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलीने तिच्या मृत्यूसाठी रुस्तमला जबाबदार धरले होते. रुस्तमने आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप मृत मुलीने या सुसाईड नोटमधून केला होता. तसेच बाबा, माझ्या मृत्यूचा बदला घ्या, असेही त्यात म्हटले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अधिकारी संत प्रसाद म्हणाले, ‘25 ऑगस्ट रोजी एका 15 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी 354, 306, 7/8 या कलमांतर्गत पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ या प्रकरणाची दखल पोलीस अधिक्षकांनीही घेतली आहे.

पोलीस अधिक्षक त्रिभुवन सिंह म्हणाले, ‘पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा नोंदवला आहे. तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आता आम्ही दोघांना पकडलं असून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय अहवालानंतर आणखी गोष्टी स्पष्ट होतील.’

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.