खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार सराईताना अटक ; गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पुणे : खुनाचा प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेल्या सराईत आरोपींना गुन्हे शाखा युनिट ६ ने केले जेरबंद आहे.संतोष उर्फ गट्टया तुकाराम आव्हाळे (वय ३६ रा. आव्हाळवाडी, मारूती मंदिरासमोर, ता. हवेली, जि. पूणे), नवनाथ दादाभाउ गावडे (वय ३५ वर्षे, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पूणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीकंद पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेला मुख्य आरोपी संतोष उर्फ गट्टया आव्हाळे हा सरडेमळा, लोणीकंद येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शिताफीने संतोष उर्फ गट्टया आव्हाळे व नवनाथ गावडे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी संतोष उर्फ गट्टया आव्हाळे याच्याकडे चौकशी केली
असता त्याने जून्या भांडणाच्या वादातून नमूद गुन्हयातील फिर्यादी अक्षय कावडे यास जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा साथीदार नवनाथ गावडे असे दोघांनी मिळून कोयत्याने वार केल्याचे सांगितले. दोघांनी मिळून वर नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी नवनाथ दादाभाउ गावडे यास यापूर्वी लोणीकंद पोलीस स्टेशन कडील २०१० सालातील खुनाच्या गुन्हयामध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो कोरोना काळामध्ये पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह- आयुक्त पुणे शहर डॉ.रविंद्र शिसवे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट
६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि.नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, संजीव कळंबे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.

 

 

 

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.