सराईत दुचाकीस्वार चोराला अटक ; 17 दुचाकी जप्त 

पुणे :  पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 10 हजार किंमतीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

समीर दत्तात्रय रांगावकर (वय 34, रा. विमाननगर, पुणे मुळगाव – संगमेश्वर, रत्नागिरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.रांगावकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतून चोरी झालेल्या दुचाकी बाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याचा तपास करत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी ही दुचाकी एक व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसले. अधिक तपास केला तेव्हा ही चोरी समीर रांगावकर याने केल्याचे समजले. पोलिसांना रांगावकर हा नवी पेठ निंबाळकरवाडा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली तेव्हा त्यानेे विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.त्याच्याकडून 4 लाख 10 हजार रुपयांच्या 17 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलूस निरीक्षक शैले संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, कर्मचारी अमोल पवार, इम्रान शेख,अशोक माने, विजय थोरात, अनिकेत बाबार, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.