आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना RTPCR चाचणी बंधनकारक

मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत वेळो वेळी जारी करण्यात आलेले आदेश आजपासून लागू होणार आहेत असे पत्रक राज्य शासनाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने State Government युरोप, मध्य-पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी नकारात्मक RT-PCR अहवाल अनिवार्य केला आहे. तथापि, त्यांनी त्यांच्यासाठी 14-दिवसांच्या अलग ठेवण्याची Quarantine अट काढून टाकली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (SOP) नुसार हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीने जरी लसीचे दोन्ही डोस पूर्ण घेतले असतील तरी कोरोनाची आरटीपीसीआर (RT PCR) चाचणी करणे बंधनकारक आहे. हाच नियम राज्यातही लागू राहील असे पत्रक राज्य सरकारने प्रसिध्दीस दिले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.