पिंपरीतील सलोनी बार वर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई कारवाई

पिंपरी चिंचवड : रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या पिंपरीतील सलोनी बारवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी बारचा मालक, वेटर आणि कुक यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याठिकाणी असलेल्या 46 ग्राहकांकडून 23 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.28) रात्री 12.30 वा करण्यात आली.

बार मालक राजेश कनैय्या लालवानी (वय 48 रा. पंचवटी सोसायटी, पिंपरी कॉलनी, पिंपरी, पुणे), अराफत मोजरिम मंडल (वय 24 रा. साई चौक पिंपरी पुणे), हबीबुल माफीजुल शेख (वय 19 वर्षे रा. सदर), कौसीक अनारूल मुल्ला (वय 21 रा. सदर ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील साई चौक येथे येथील सलोनी बार हा रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच  सलोनी बारचे मालक राजेश लालवानी हे त्यांच्या सलोनी बार मध्ये गिहाईकांना बसण्यास परवागी देऊन शर्ति पेक्षा जास्त वेळ बार चालू ठेवुन बारमध्ये 35 ते 40 लोकांना जमवुन मानवी सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य करून, कोरोना या साथीच्या रोगाची संसर्ग पसरवण्याची हयगयीची कृत्य करीत आहेत. अशी बातमी मिळताच सामाजिक सुरक्षा विभागाने या ठिकाणी सापळा रचून बारवर कारवाई केली. या वेळी बारमध्ये असलेल्या 46.ग्राहकांकडून 23 हजार रूपये दंड वसूल करण्यात.आला. तसेच, 7 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल बारमधून जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे,  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ अति. कार्यभार पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सपोनि डॉ. अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार सपोफौ कांबळे, पोहवा शिरसाट, पोहवा बर्गे, पोहवा लोंढे, पोना  मुठे, पोना करचुंडे, पोना कारोटे, पोना गारे, मपोना जाधव, मपोशि माने यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.