पुणे हादरले ! मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार
पुणे : पुणे शहरात चौघांनी २५ वर्षीय मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.ही घटना जनता वसाहतीत सायंकाळी घडली. सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
श्रीकांत सरोदे (वय ३६), आदित्य पवार (वय १९), दुरवेश जाधव (वय ३६) आणि आशिष उर्फ रड्या मोहीते (वय १८) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी मतिमंद आहे. ती सातारा रोड परिसरात राहते. दरम्यान पिडीत मुलगी स्वारगेटवरुन शुक्रवारी सायंकाळी घरी जात होती. त्यावेळी चार आरोपीपैकी एक जण तिला भेटला व तिला स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले. चौघांनी येथील बंद खोलीत नेहून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तेथून तिला स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले. चौघांनी येथील बंद खोलीत नेहून तिच्यावर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले व त्या घराजवळ गेल्यावर पोलीसांनी आतमधील मुलीला आवाज दिला. तेव्हा देखील रडण्याचा आवाज येत होता .पण काही केल्या दरवाजा उघडला गेला नाही. त्यावर अखेर पोलीसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा पीडित मुलीसह चार आरोपी आढळून आले. त्यानंतर तात्काळ पीडित मुलीस उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!