मी बाळूमामांचा वारसदार नाही तुमच्या सारखा भक्त, अध्यात्मिक गुरु मनोहरमामां भोसलेंचे स्पस्टीकरण

 

पंढरपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुर येथील ग्रामपंचायतीने करमाळ्यातील मनोहर मामा यांच्या बद्दल एक पत्र काढल्यानंतर बाळूमामा यांच्या वारसावरून वाद निर्माण झाला आहे. आपण बाळूमामाचे भक्त आहोत बाळूमामा ची उपासना करतो पण आजपर्यंत कधीही बाळूमामांचे वंशज अथवा त्यांचा अवतार आहे असं वक्तव्य कुठेही केलेले नाही तसेच श्रीक्षेत्र उंदरगाव येथील मठातून भक्तांची कुठलीही आर्थिक लूट केली जात नाही असे स्पष्टीकरण मनोहर मामा यांनी दिलेल आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे संत बाळूमामा चे मूळ स्थान आहे येथील ग्रामपंचायतीने करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा हे संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करून भक्तांकडून आर्थिक देणगी घेत असल्याचा आरोप आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी केला आहे यावर ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे.ग्रामपंचायतीच्या या ठरावा नंतर आदमापुर येथील बाळूमामाचे भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.

त्यावर उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा यांनी आपण बाळूमामा चा वारसदार किंवा शिष्य नसून केवळ भक्त म्हणून सेवा करत आहे. उंदरगाव येथे माझ्या स्वतःच्या शेतात बाळूमामाचे मंदिर उभे केले आहे येथे दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात केवळ मंदिर आहे म्हणून माझा आणि आदमापुर येथील बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.