रागाने बघितल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने टोळक्‍याकडून तरुणांवर कोयत्याने वार ; दोघांना अटक

पुणे : रस्त्याने जाताना रागाने बघितल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तरुणासह टोळक्‍याने दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. याबरोबरच मोठमोठ्याने आरडाओरडा करीत, शस्त्रे हवेमध्ये फिरवून दहशत निर्माण केली. हि घटना गुरूवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ डेअरीसमोर घडली.

जुबेर ऊर्फ वडी मुश्ताक शेख (वय २०, रा. ४०७, लोहियानगर) आणि आकीब असद दुल्लाह शेख (वय २१, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फैजान शेख (वय 23, रा.मीठानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह गप्पा मारत बसले होते. आरोपी जुबेर हा फिर्यादीकडे रागाने पाहत होता. फिर्यादीने त्याला रागाने का बघतोस? असे विचारले असता जुबेरने त्याच्या मित्रांना ‘आज तेरा और सलमान का हिसाब खत्म करता हू’ असे म्हणत त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी कोयत्याने त्यांच्या हात, डोकं आणि डोळ्याच्या डाव्या बाजूस वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. आरोपींनी तेथून पळून जाताना मोठमोठ्याने आरडाओरडा करीत तसेच त्यांच्याकडील शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिकांनी घराची दारे खिडक्या बंद केली.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही.एस.जाधव करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.