जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉड व सिमेंट गट्टुने हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉड व सिमेंट गट्टुने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.27) कर्वेनगर बिल्डींगच्या समोरील सार्वजनिक रोडवर रात्री साडे नऊच्या सुमारास घडला आहे.
अक्षय शांताराम सावंत असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल सुधाकर बोकन (वय-26 रा. वारजे जकात नाका), सिध्याप्पा कंदकुर (वय-19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून सागर कोळेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीमा शांताराम सावंत (वय-47 रा. प्राईम हेरीटेज, शिवणे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि अक्षय यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. याच वादाचा राग मनात धरुन आरोपींनी संगनमत करुन अक्षयवर लोखंडी रॉड व सिमेंट गट्टुने हल्ला केला. आरोपींनी अक्षयच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अक्षयच्या आईने तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!