तू माझ्याकडे डोळे वटारून का बघतो असे म्हणत एकावर कोयते, सिमेंटच्या गट्टने खुनी हल्ला ; पिंपरीतील घटना

पिंपरी चिंचवड : तू माझ्याकडे डोळे वटारून का बघतो, थांब तुला दाखवतोच’ असे म्हणत चहाच्या दुकानात चहा पित असलेल्या एका व्यक्तीवर कोयते, सिमेंटच्या गट्टने खुनी हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. 28) दुपारी लालटोपीनगर, पिंपरी येथील महाराष्ट्र टी हाऊस या दुकानात घडली. याप्रकणरी 4 जणांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नबीलाल बंदगी शेख (वय 34, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित ससाने (वय अंदाजे 24), साजन ससाने (दोघे रा. मोरवाडी कोर्टाच्या मागे, पिंपरी) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास लालटोपी नगर येथील महाराष्ट्र टी हाऊस या चहाच्या दुकानात चहा पित होते. त्यावेळी चार आरोपी कोयते घेऊन आले. आरोपी सुमित याने फिर्यादी यांना ‘तू माझ्याकडे डोळे वटारून बघतो का. थांब तुला दाखवतोच’ असे म्हणत कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारले. यात फिर्यादी शेख यांच्या डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी
झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.