पिंपरी गावात सोसायटीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू ;बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे राजेशने गमावला जीव
पिंपरी चिंचवड : सोसायटीची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी महापालिकेचे ठेकेदार, कामगार, संबंधित
लन सोसायटीचे बिल्डर, चेअरमन आणि अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी गावात शुक्रवारी (दि. 27) दुपारी घडली.
राजेश जयराम गायकवाड (वय 47, रा.जुना काटे-पिंपळे रोड, पिंपरीगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत राजेश यांचा भाऊ रणजित जयराम गायकवाड (वय 46) यांनी शनिवारी (दि. 28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांडपाण्याच्या ड्रेनेजचे व पेविंग ब्लॉकचे काम करणारे कर्मचारी, ठेकेदार, साई कम्फर्टस सोसायटीची संरक्षक भिंत बांधणारे बिल्डर काळू उर्फ विनोद मतानी, साई कम्फर्टस सोसायटीचे चेअरमन आणि इतर यांच्या विरोधात याप्रकरणी निष्काळजीपणे मृत्यू घडविल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मृत राजेश गायकवाड हे साई कम्फर्टसच्या कम्पाउंडच्या भिंतीलगत महानगर पालीकेचे
चालू असलेले सांडपाण्याच्या ड्रेनेजचे तसेच पेविंग ब्लॉकचे काम पाहुन येत असताना अचानक साई कम्फर्टस सोसायटीची संरक्षक
भिंत त्याच्या अंगावर कोसळून जबर जखमी झाले व त्यातच त्याचा मृत्यु झाले. याबाबत भारतीय दंड विधान कलम 304 ( अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.
या आधीही ही भिंत दोन वेळा कोसळली होती. या घटनांनंतर स्थानिक नागरिकांनी संबधित बिल्डरला भिंतीचे मजबुतीकरणं करण्याची विनंतीही केली होती, मात्र त्याकडे संबंधित बिल्डरने दुर्लक्ष केले होते. तडे गेलेली ही भिंत परत कोसळली आणि एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!