बसचा धक्का लागून दुभाजकावर आदळल्याने 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : सायकलवरून जात असताना बसचा धक्का लागून रस्त्यालतील दुभाजकावर आदळल्याने 16 वर्षांच्या मुलीला जबर दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. हि घटना शनिवारी सायंकाळी मॉडेल कॉलनीतील दीप बंगला चौकाजवळ घडली.चंदा परमार (वय 16, रा. थोरवे चौक, दीप बंगला चौकाजवळ, मॉडेल कॉलनी) असे अपघातात मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा हि तिच्या सायकलवरून शनिवारी दुपारी 1 वाजता दीप बंगला चौकाजवळच्या थोरवे चौकातुन डिएसके शो रूमसमोरील रस्त्याने जात होती. त्यावेळी गोखले नगर- पुणे स्टेशन या मार्गावरील बस (एम.एच. 12.एफ.झेड, 8320) हि शिवाजीनगरच्या दिशेने येत होती.

त्यावेळी चंदाला बसच्यामधील भागाचा धक्का बसल्याने ती दुभाजकावर आदळली. त्यावेळी तिच्या कमरेला जबर दुखापत झाली. गंभीर अवस्थेतच तिला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.