सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; पुण्यात खळबळ

पुणे : पुणे शहर पोलिस दलाच्या मोटर परिवहन विभागातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवारी) दुपारी उघडकीस आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या पत्नीचे महिन्याभरापुर्वी निधन झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते.त्यामधूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राजेश दगडू महाजन (50, रा. हरपळे वस्ती, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.महाजन हे पुणे शहर पोलिस दलातील मोटर परिवहन विभागात (एमटी) कार्यरत होते.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, राजेश महाजन हे लष्करात होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी स्वीकारली होती. ते पुणे शहर पोलीस दलात दाखल
होते. दरम्यान आज (सोमवार) दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.काही वेळापूर्वी हा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेतली आहे. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयांनी सांगितले आहे.  याप्रकरणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.