आधार कार्डासोबत जोडलेला मोबाईल नंबर विसरलात? जाणून घ्या शोधण्याचा एक सोपा मार्ग

मुंबई :जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अनेक वेळा बदलला असेल किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त नंबर असतील आणि तुमच्या आधारशी कोणता नंबर जोडलेला असेल हे तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या हे तपासू शकता. दूरसंचार विभागने नुकतेच एक पोर्टल लाँच केले आहे, ज्याच्या वापराने तुम्ही हे चेक करू शकता की एका आधार कार्डवर किती मोबाइल नंबर नोंदणीकृत आहेत. टेलीकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर प्रोटेक्शनच्या वेबसाइटवर जाऊन हे चेक करू शकता.

आधार कार्डासोबत जोडलेला मोबाईल नंबर असा चेक करा

* सर्वप्रथम दूरसंचार विभागाचे पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in वर व्हिजिट करा.

* येथे 10 अंकी मोबाइल नंबर नोंदवा.

* यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफिकेशनसाठी मोबाइलवर ओटीपी येईल.

* हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय होईल.

* तुमच्या सर्कलमध्ये सुविधा उपलब्ध असेल तर व्हेरिफिकेशन नंतर सर्व मोबाईल नंबरची लिस्ट येईल, जे तुमच्या आयडीवर सुरू आहेत.

* जर तुम्हाला वाटत असेल की एखादा नंबर असा आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही तर त्या नंबरची तक्रार याच पोर्टलवर करू शकता.

* सरकार तुम्ही सांगितलेल्या नंबरची चौकशी करेल.

 जर नंबर तुमच्या आयडीवर चालत असल्याचे आढळले तर तो ब्लॉक केला जाईल.

* ही प्रकिया तुम्हाला पुढील सर्व संभाव्य नुकसानापासून वाचवू शकते.

ओटीपीद्वारे मोबाईल क्रमांकाशी आधार कसा जोडायचा

मोबाईल ग्राहक त्यांचा नंबर आधारशी लिंक करू शकतात आणि ओटीपीद्वारे पुन्हा पडताळणी करू शकतात. मात्र, ज्यांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारशी आधीच जोडलेले आहेत तेच ते वापरू शकतील. OTP द्वारे तुमच्या मोबाईल क्रमांकाशी आधार कसा जोडायचा

*) तुमच्या मोबाइल क्रमांकावरून 14546* वर कॉल करा.

*) तुम्ही भारतीय आहात की अनिवासी आहात ते निवडा

*) 1 दाबून आधार पुन्हा सत्यापित करण्यास आपली संमती द्या

*) तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि 1 दाबून पुष्टी करा

*) हे ओटीपी व्युत्पन्न करते जे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवले जाते

*) UIDAI कडून तुमचे नाव, फोटो आणि DOB मध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या ऑपरेटरला संमती द्या

*) IVR तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक वाचतो

*) जर ते बरोबर असेल तर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा

*) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 दाबा

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.