चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ, पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : चारित्र्यावर संशय घेत तिचाविवाहितेचा छळ केला. तसेच घरातील किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 मार्च 2015 ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीत आकुर्डी, चिंचवड आणि चिखली परिसरात घडला.

पती संजय ऊर्फ सनी एकनाथ गायकवाड (वय 34), सासू (वय 52 दोघे रा. ओझर्डे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाड्याने राहत असताना घरातील लाईट चालू ठेवल्याच्या कारणावरून सासूने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पतीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ करत घटस्फोट देण्याची मागणी केली. फिर्यादी यांना लग्नात घातलेले स्त्रीधन आरोपींनी परत न करता त्याच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी केली. विवाहिता आणि त्यांच्या माहेरच्या लोकांना आरोपींनी शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. आर. लोखंडे तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.