परप्रांतीय कंटेनरचालकाला लुटणार्या सराईतांना अटक; कोंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : परप्रांतीय कंटेनर चालकाला मोटार आडवी लावून लुटणाया सराईतांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकड आणि मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अतुल विजय कचरावत (वय २५ रा. वानवड), प्रशांत लखन कचरावत (वय २७) आणि शुभम शशिंकात जगताप ( वय २० रा. हांडेवाडी रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी हाकम अब्दुलमजीद (वय ५० रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.

हाकम कंटेनरचालक असून २८ ऑगस्टला ते ऊंड्री येथून जात असताना सराईतांनी गाडी आडवी लावून त्यांना थांबविले. गाडीचे नुकसान झाले आहे असे खोटे सांगुन त्यांचे अंगावर धावुन जावुन मोटारीत बसवुन हाकम यांना न्याती ईस्टेट परिसरात नेले. त्यांचेकडील मोबाईल आणि पाच हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेला होता.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शानाखाली कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे तपास करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार ज्योतीबा पवार व सतीष चव्हाण यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यावेळी तपास पथकातील अंमलदार सातवनगर परिसरात असताना तिघेजण एका मोटारीत बसल्याचे दिसून आले. त्यांच्यावर पथकाने अचानकपणे झडप घालून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कंटेनरचालकाला लुटल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, रमेश गरुड, ज्योतीबा पवार, सतीष चव्हाण तुषार अल्हाट, लक्ष्मण होळकर, किशोर वळे यांनी केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.