विमाननगर येथील हॉटेल तलब मध्ये अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे :  विमाननगर येथील हॉटेल तलब मध्ये अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने ३० ऑगस्ट या दिवशी धाड टाकत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळे हुक्का फ्लेवर्स, 11 हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 3 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हॉटेलचा मालक सचिन अशोक रणपिसे (वय-30 रा. येरवडा), अमर संतोष गायकवाड (वय-26 रा. येरवडा) हॉटेल मॅनेजर दिलीपकुमार मांगीलाल मालविया (वय-26 रा. हडपसर) यांच्या विरोधात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) कायद्यांतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विमाननगर परिसरातील देवकर वॉशिंग सेंटर जवळ असलेल्या हॉटेल तलब येथे अवैधरित्या हुक्का बार चालु  असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण , अंमली पदार्थ विरोध पथक दोन पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हेशाखेकडील पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन छापा टाकला.

त्यावेळी हॉटेलचा मालक सचिन रणपिसे हा हॉटेल मॅनेजर मालविया याच्याकडून हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का बार चालवून ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी पुरवीत असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळे हुक्का फ्लेवर्स, 11 हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 3 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह
आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक.शिल्पा चव्हाण, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , अंमली पदार्थ विरोधी पथक एक व समाजिक सुरक्षा विभागचे पोलीस अमंलदार यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.