पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांकडून पर्दाफाश

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या ३ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. पिंपरी रेल्वे स्टेशन समोर शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.

राहूल जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समीर हरी राठोड (वय २१, रा. काळेवाडी फाटा) व एक महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शितल गिरी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्टेशन समोर स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी तरुणींची सुटका केली. तर ३ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.