कोयता बाळगल्या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाला अटक
पिंपरी चिंचवड : कोयता बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 26) दुपारी साडेबारा वाजता वेताळनगर झोपडपट्टी चिंचवड येथे करण्यात आली.
समीर लुकमान शेख (वय 22, रा. भोईरनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पी के भदाणे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस बाहेर पेपर पेपरआयुक्तालयाच्या हद्दीत लाठ्या, काठ्या, चाकू, सुरे, कोयता, भाले, सोटे यांसारखी घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. असे असताना देखील आरोपीने लोखंडी कोयता बाळगला. कोयता हवेत फिरवून ‘कोण माय का लाल मेरे नाद को लगता है, मै एक एक को देखता हुं’ असे मोठमोठ्याने ओरडत आरोपीने लोकांना धमकी दिली.दरम्यान, लोकांची धावपळ होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी समीर याला अटक केली असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!