पुणे पोलिसांची मोठी कारवाई; क्रिकेट बेटिंग प्रकरणी दोन आंतरराष्ट्रीय बुकीना अटक , 1 कोटी जप्त, 1 कोटीची रोकड जप्त

पुणे :  पुण्यात दोन आंतरराष्ट्रीय बुकींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रूपायांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरालगतच्या बुकींनी रातोरात काढता पाय घेतला.

सट्टाकिंग गणेश भिवराज भुतडा  (वय ४८, रा. त्रिमूर्ती सोसायटी, रास्ता पेठ ) आणि अशोक भवरलाल जैन उर्फ देहूरोडकर ( वय ४८, रा. मार्केटयार्ड ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

भुतडा व जैन  क्रिकेट सामान्यावर सट्टा घेणारे मोठे बुकी म्हणून ओळखले जातात. सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांवर ते मोठी उलाढाल जगभरातून करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हे अन्वेषण विभाग व सामाजिक सुरक्षा शाखेतील पथकांनी एकाचवेळी छापेमारी करून ही कारवाई केली.

दरम्यान, या कारवाईची चाहूल लागताच पिंपरी  चिंचवड,  लोणावळा आणि मुंबईतील काही मोठे बुक्की परागंदा झाल्याची चर्चा आहे.  सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली  याप्रकरणाचा तपास जारी करण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.