मानसिक तणावातून जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

कवठे  : मानसिक तणावातून जवानाने घरातील तुळईला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाई तालुक्यातील कुसगाव येथे उघडकीस आली आहे.

अभिजित कृष्णदेव वरे (वय ३२) असे मृताचे नाव आहे.अभिजित हा सैन्यात रायपूर येथे नोकरीला होता. त्याची बदली आसाम येथे झाली होती. तीन महिन्यांपासून तो कुसगाव येथे सुटीवर आला होता.

अभिजीत हे पत्नी, मुले, आई आणि भावासमवेत कुसगावमध्ये एकत्र राहत होते.तो सतत मानसिक तणावाखाली असायचा. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. दरम्यान,त्याने काल (ता. 23) घरातील सर्व जण जेवण करून झोपल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. अभिजीत यांचे चुलते संजय रामचंद्र वरे यांनी याबाबतची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली. सहाय्यक फौजदार आर. झेड. कोळी, पोलीस नाईक वैशाली चव्हाण, शमा माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अभिजीत हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.