कात्रजचा खून झाला ! कात्रज चौकातील चौकातील बॅनरने चर्चांना उधाण

पुणे : पुण्यात विविध फ्लेक्स लागतात आणि त्याची वेगळी कहाणी दरवेळी समोर येत असते. असाच एक फ्लेक्स कात्रज चौकात लावण्यात आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कात्रज चौकातील एका खाजगी प्लॉटवर अज्ञातांनी २०/३०चा मोठा बॅनर लावण्यात आला होता. तो महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून उतरविण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे कात्रज येथील राजकारण तापते आहे काय? की आणखी काही याच्यामागे कारणे आहेत? याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र या फ्लेक्समुळे संपूर्ण कात्रज परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

कात्रजचा खून झाला ! असा मजकूर असलेला एक भला मोठा फ्लेक्स कात्रज चौकात लावण्यात आला आहे. त्यावर रक्ताचे डाग आणि एक चाकू दाखविण्यात आला आहे.कात्रज चौकात मोकळ्या जागेत एक भला मोठा फ्लेक्स अज्ञातांनी लावला आहे. काळ्या आणि लाल रंगात त्यावर “कात्रजचा खून झाला” असे लिहीत चाकू आणि रक्त दाखवले आहे. आज पहाटे कात्रजकरांना हा फ्लेक्स दिसून आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हा फ्लेक्स कोणी लावला आणि त्याचा नेमका संबंध कोणाशी असा प्रश्न निर्माण झाला असून, उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथील उड्डाणपूलाचे उद्घाटन केले होते. कात्रज कोंढवा रोडवरून देखील या भागात मोठे राजकारण सुरू आहे. या फ़्लेक्समुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील भागात उद्भवू शकतो. या भागात विकास कामे सुरू असले की राजकारण होते हा या भागाचा राजकीय इतिहास आहे, त्यामुळेच कात्रज कोंढवा रस्ता असेल किंवा कात्रज तळे असेल विकासापासून वंचित राहिले आहे

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.